नवी दिल्ली: दिल्लीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषित वातावरणामुळे दिल्लीकरांना श्वास घेणे देखील अवघड झाले आहे. प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी दिल्ली सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठीच दिल्ली सरकारने ऑड इव्हन नंबर हे नियम लागू केले आहे. दरम्यान या नियमाच्या उल्लंघन केल्या प्रकरणी दिल्लीतील भाजप नेते विजय गोयल यांना दंड आकारण्यात आला आहे. दिल्लीत सम विषय प्रमाणात गाड्या रस्त्यावर उतरतात, यामुळे प्रदूषण पातळीत घट होत असल्याचा दावा दिल्ली सरकारकडून केला जात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तसा दावा केला आहे. दिल्लीकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मात्र दिल्लीतील विरोधी पक्षांकडून या नियमाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे. भाजपने देखील या नियमाला विरोध केला आहे.