दिल्ली कॉंग्रेस अध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा !

0

नवी दिल्ली- २०१९ ची लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये युतीबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान आप आणि कॉंग्रेस युतीला नेहमी विरोध करणारे कॉंग्रेस नेते दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला आहे. माकन यांनी आपल्या राजीनाम्यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभारही मानले आहेत.

माकन हे कायमच काँग्रेस आणि आपच्या युतीविरोधात होते. त्यामुळे आता माकन यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आणि आप यांच्यामधील युतीच्या घडामोडींना वेग येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. तीन राज्यांत सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी समान विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांनी तीन राज्यातील विजयानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, सर्व समान विचारधारेच्या पक्षांनी एकजूट होऊन भाजपाला हरवण्यासाठी संघर्ष करायला हवा. इशाऱ्या-इशाऱ्यांमध्ये केजरीवालांनी देखील अनेक वेळा जातीयवादी ताकदींविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करीत युतीचे संकेत दिले आहेत.