दिल्ली डेअरडेविल्सच्या खेळाडूंनी साधला डीटीडीसीच्या ग्राहकांशी संवाद

0

मुंबई-डीटीडीसी या भारताच्या आघाडीच्या एक्स्प्रेस पार्सल सेवा प्रदाता कंपनी आणि दिल्ली डेअरडेविल्सच्या अधिकृत लॉजिस्टिक्स भागीदाराने फ्रँचायझीमधील काही प्रमुख खेळाडूंसोबतच त्यांच्या ग्राहकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये डीटीडीसीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व भारताचे माजी क्रिकेट पटू सौरव गांगुली यांची उपस्थिती लाभली

प्रख्यात क्रिडा पत्रकार व लेखक बोरिया मजुमदार यांनी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. या कार्यक्रमाला टीममधील गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, संदीप लमिछाने हे प्रमुख खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंनी क्रिकेटजगतातील त्यांच्या प्रवासाबाबत चर्चा केली आणि भव्य यश मिळालेले असताना देखील विनम्र राहण्याचे महत्व त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डीटीडीसीचे कार्यकारी संचालक अभिषेक चक्रबर्ती यांनी ”कस्टमर इव्हेण्ट सत्राने आमच्या ग्राहकांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसोबत चर्चा करण्याची संधी दिली. कार्यक्रमामध्ये अशा दिग्गज व्यक्तींची उपस्थिती पाहून ग्राहक खूपच आनंदित झाले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल डीटीडीसीची संपूर्ण टीम डीडी संघाचे खेळाडू व सौरव गांगुलीचे आभार मानत असल्याचे सांगितले.