दिल्लीत प्रदूषण आणीबाणी; ‘हेल्थ इमर्जन्सी’ लागू !

0

नवी दिल्ली: सध्या दिल्लीकरांना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून पुढच्या आठवड्यात आणखी खालावण्याची शक्यता आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात अधिक वाढ झाल्याने श्वास घेणे देखील लोकांसाठी कठीण झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने दिल्ली आणि नोएडामध्ये हेल्थ इमर्जन्सी लागू केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत बांधकामांवर बंदी घालण्यात आलेली आहे.

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूपच खराब आहे. वायू प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दिल्ली सरकारने आज शुक्रवारी 1 नोव्हेंबरपासून शाळकरी मुलांना मास्कचे वाटप केले आहे. ‘दिल्ली गॅस चेंबर बनत आहे. प्रदूषित हवेमुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. शाळकरी मुलांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी 50 लाख मास्कचे वाटप करण्यात आले आहे. दिल्लीतील नागरिकांनी देखील प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी मास्क वापरावेत’ असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.