नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. दिल्लीकरांचा श्वास कोंडला जातो आहे. दरम्यान यावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे.दिल्ली प्रदूषणाचा प्रश्न हा इतक्या वर्षापासून कायम असताना केंद्र सरकारने याबाबत काही उपाययोजना का नाही केल्या? असे सांगत केंद्र सरकारला धारेवर धरले.
दिल्ली सरकार देखील प्रदूषणाबाबत उपाययोजना करत आहे, सम-विषम प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरवीत आहे. त्यामुळे प्रदूषणात काही प्रमाणात घट झाल्याचा दावा देखील केला जातो आहे.