दिल्लीतील प्रदूषणाला केंद्र, पंजाब आणि हरियाणा सरकार जबाबदार-केजरीवाल

0

नवी दिल्ली-दिल्ली सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करत आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत होत असलेल्या वायू प्रदूषणाला केंद्र सरकार, पंजाब आणि हरियाणा सरकार जबाबदार असल्याचे सांगितले आहे. ट्वीटरवरून केजरीवाल यांनी केंद्र सरकार, पंजाब आणि हरियाणा सरकार दिल्लीतील प्रदूषणाला जबाबदार असल्याचे सांगितले आहे.

दिल्लीतील आम आदमी पार्टीची सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु केंद्र, पंजाब आणि हरियाणा सरकार कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही असे आरोप केले आहे. या राज्यातील शेतकरी देखील चिंतीत आहे असे आरोप केजरीवाल यांनी केले आहे.