जोपर्यंत लस नाही तोपर्यंत शाळा नाही: दिल्ली सरकारचा निर्णय

0

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटात शाळा, महाविद्यालये बंद आहे. जवळपास ८ महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. दिवाळीनंतर सुरु होणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता नवीन वर्षातच शाळा सुरु होतील. दिल्ली सरकारने तर जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरु न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले.

शाळा सुरु करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रतिक्रिया घेतली असता, पालक मुलांना शाळेत पाठविण्यात असमर्थ आहेत, हीच बाब लक्षात घेऊन जोपर्यंत लस नाही तोपर्यंत शाळा नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.