नवी दिल्ली: काल प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. या हिंसाचारावरून शेतकऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणात २२ एफआयआर दाखल करण्यात आले असून दिल्लीसह अनेक ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आले आहे.काल गृहमंत्रालयाची तातडीची बैठक झाली यात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर गृहमंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक सुरु असून गृहविभाग मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आज बुधवारी दुपारी अडीच वाजता पोलीस पत्रकार परिषद घेणार असून यात कारवाईबाबत माहिती दिली जाणार आहे.