मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांच्या पुण्यतिथी बाबत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रक काढले आहे, त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याबाबत २०१५ साली परीपत्रक काढले होते. आपल्या काळात बाळासाहेब यांनी अनेक नेते घडविले आहे, त्यांनीकुठलीही निवडणूक न लढवता राजकारणावर, सामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, असे मुंबई मनपाच्या नगरसेवकांनी म्हटले आहे.
मनपाचे नगरसेवक किरण लांडगे यांनी बाळासाहेबांचे नाव थोर नेत्यांच्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय थोरपुरुष, नेत्यांच्या पुण्यतिथ्या साजरी करण्याच्या यादीत सुधारणा करण्यात यावी, आणि त्यात बाळासाहेब यांचे नाव टाकण्याचा ठराव सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.