नांदेड जिल्ह्यातील बोंढार ( हवेली ) येथे अक्षय भालेराव या दलित कार्यकत्याचा खुन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी

शहादा : नांदेड जिल्ह्यातील बोंढार ( हवेली ) येथे अक्षय भालेराव या दलित कार्यकत्याचा खुन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संजय खंडारे यांनी केली आहे . याबाबत शहादा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करणारा नांदेड जिल्ह्यातील बोंढार ( हवेली ) येथील तरुण अक्षय भालेराव या तरुणाला गावातील जातीयवादी गावगुंडांनी अतिशय निर्घुणपणे मारहाण करुन जिवेठार मारले तसेच लातूर जिल्ह्यातील रेजापूर ठिकाणची असून तीन हजार रुपयांसाठी गावातील सावकराने तबकाळे या मातंगल समाजाच्या तरुणाला अतिशय क्रुरपणे ठार केले . त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन महाराष्ट्र शासनाने करावे . हे सरकारद दलित – आदिवासी विरोधातले असून मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर सामाजिक न्याय विभागाचे संजय खंडारे यांच्यासह जि . प . सदस्य मोहन शेवाळे ,, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर , गोविंद सामुद्रे , आदिवासी सेलचे संतोष पराडके , बापू घोडराज , युवा जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर , अनिल साद्रे , वेडू जगदेव , हिरालाल जगदेव , शुभम कुवर , विक्रम पानपाटील , भगवान पाटील , अरुण जगदेव आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत .