सिंधी समाजा बददल अपशब्द उच्चारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी
भुसावळ प्रतिनिधी l
दि. 27मे रोजी उल्हासनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात सिंधी समाजा बददल 100 सिंधी कुत्रे देखील माझे काहीही बिघडवु शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उल्हासनगर कॅम्प 5 प्रभात गार्डन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमासाठी पुर्व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व माजी आमदार आनंद परांजपे मुख्य अतिथी होते. त्या कार्यक्रमात भाषण करतांना एका व्यक्ति बददल निशाणा साधतांना काही म्हणीचे सांगत असतांना आव्हाडांची जीभ घसरली व त्यांनी अचानक एक शेर को मारने के लिए 100 सिंधी कुत्रे देखील काही करू शकत नाही अशा विधानाने सर्व सिंधी समाजात संताप पसरला आहे. अशा प्रकारे संपुर्ण सिंधी समाजाचा अपमान करत आहे, • असा अपमान सिंधी समाज सहन करु शकत नाही. सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे अपशब्द उदगारल्या बददल व सिंधी समाजाचा अपमान केल्या बददल सर्व सिंधी बांधवांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे व तसेच प्रशासनाच्या वतीने अशा या बेजवाबदारीपणे वक्तव्य करणा-या विकृत मनोवृत्ती असलेला जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम 295ए प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी असे सर्व सिंधी समाजाच्या डी. वाय एस.पी यांना निवेदन देण्यात आले