पुन्हा नोटबंदी, रिझर्व्ह बंकेने 2000 रुपयाची नोट बंदची केली घोषणा

नवी दिल्ली :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. असा सल्ला दिला आहे. इथून पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोट ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना आरबीआयने केलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे.

२ हजार रुपयांच्या नोटा कशा आल्या चलनात?

९ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आश्चर्याचा धक्का देत देशात नोटबंदीची घोषणा केली होती. याअंतर्गत १ हजार आणि ५०० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बाजारात पुन्हा ५०० रुपयाची नवी नोट आणण्यात आली, मात्र १ हजार रुपयांच्या जागी २ हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठी टीकाही झाली होती. मोठ्या किंमतीच्या नोटा चलनातून बाद करून पुन्हा २ हजार रुपयांची नवी नोट आणल्याने नोटबंदीचा नेमका उद्देश काय होता? असा प्रश्नही तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. तसंच लवकरच ही नोट चलनातून बाद केली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता अखेर रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्णय घेतला असून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे.