चलनातून बाद ९९.३० टक्के नोटा आरबीआयकडे जमा

0

मुंबई-८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० आणि १ हजार रुप्याच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. ऐतिहासिक असा हा निर्णय होता. नोटबंदीनंतर बाद नोटा बँकेत जमा करण्यासाठी अनेक दिवस बँकेसमोर रांगा लागल्या होत्या. दरम्यान आज आरबीआयचा वार्षिक अहवाल २०१७- १८ प्रकाशित करण्यात आला आहे. यात चलनातून बाद झालेल्या ९९. ३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.