सांगली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लवकरच देशातील नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकले जाणार असल्याचे वक्तव्य केले आहे. सरकार नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये देण्यासाठी सकारात्मक असून रिझर्व बँक पैसे देत नसल्याचे आरोप आठवले यांनी केले आहे. ते सांगलीतील इस्लामपूरमध्ये बोलत होते.
एकदम १५ लाख रुपये टाकणे शक्य नाही परंतू टप्प्याटप्प्याने पैसे टाकले जातील असेही ते यावेळी म्हणाले. मोदी सरकार खूप चांगली कामे करत असून पुढील निवडणूक देखील भाजप जिंकेल असे सांगितले आहे.