नंदुरबार- काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते देवाजी चौधरी यांनी किसान काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
किसान कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष पराग पष्टे यांच्या निर्देशानुसार उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . त्यात किसान कॉंगेसच्या प्रभारी पदाची धुरा देवाजी चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
देवाजी चौधरी हे सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत, गेल्या विधान सभा निवडणुकीत त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले होते. याची दखल घेत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या शिफारसीने देवाजी चौधरी यांची रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.