धरणगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास
२६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ
धरणगाव (प्रतिनिधी) : येथील रेल्वेस्टेशनचा अमृतभारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक विकास योजनेचे २६ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी १० ते १ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमातून धरणगाव रेल्वे स्टेशनला विमानतळासारखा अत्याधुनिक लूक प्राप्त होणार आहे. सोयीसुविधा अत्याधुनिक झाल्याने प्रवाश्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
रेल्वेमंत्री. अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून खान्देशचे लोकप्रिय खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास होणार आहे. त्यात प्रामुख्याने सुसज्ज एन्ट्री गेट, २ लिफ्ट, नवीन दादरा, सुसज्ज वेटिंग एरिया, वातानुकूलित वेटिंग रूम, कोच इंडिकेटर, दोन्ही साईडला गार्डन, प्लॅटफॉर्म क्र. १-२ वर नवीन तिकीट घर, रिक्षा स्टॉप, सीसीटीव्ही, नवीन अनाउन्समेंट सिस्टीम, डिजिटल ट्रेन टाइम डिस्प्ले यासह बऱ्याच सुविधा होणार आहेत.
सदर ऐतिहासिक कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील व धरणगाव रेल्वे सल्लागार समिती व ZRUCC मेंबर प्रतिक जैन यांनी केले आहे.