धक्कादायक : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

0

मुंबई : गेल्या महिनाभरापासून राज्यात सरकार स्थापन यावरून पेच कायम होता शिवसेनेने भाजपासोबत काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादीची हातमिळवणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. रात्रीतून अचानक भाजप राष्ट्रीवादीने युती करत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.

कालपर्यंत विकास आघाडीच्या नावाखाली या तिन्ही पक्षांची सत्ते संदर्भात चर्चा सुरू होती. मात्र आज सकाळी अचानक शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करीत नवे सरकार स्थापन केले. राजकारणातील सगळे तर्क वितर्क बाजूला सारत अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे राजकीय विश्लेषक देखील भुवया उंचावून आहेत.