जळगाव – देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पुर्ण झाले तरी देखील महाराष्ट्रातल्या ग्रामिण भागातील समस्या आहे त्याच पहायला मिळत आहे. आजही आमच्या समस्या अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच शिक्षण, आरोग्य, रोजगार, गरीबी निमुर्लनाच्या आहेत. गेल्या ५० वर्षे ज्यांनी या देशात शासन केले. राज्य चालवलं. दुदैवाने या पन्नास वर्षामध्ये या मुलभुत सुविधा पुर्ण करण्याकरीता कोणतीही ठोस निर्णय घेता आला नाही. पण आज आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात आपले सरकार आल्यानंतर या मुलभूत सोयी सामान्य माणसापर्यंत पोहचला पाहिजे या गोष्टीचा पुढाकार घेतला आहे. आज महाराष्ट्राला ज्याचा अभिमान आहे त्या शेतकर्यात चांगले परीवर्तन घडले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आघाडी सरकारने शेतकर्याला पाणी, सिंचन, वीज, मार्केट देवू शकलो नाही. तेच आता आम्हाला शेतकर्यांबाबत विचारतात. आता मला त्यांना सवाल करायचा आहे की आम्ही तर दोन वर्षापासून सत्ता आमच्याकडे तुमच्याकडे तर ५० वर्षात नाकर्तेमुळे ही शेतकर्यांची अवस्था झाली आहे. तसेच, आजकाल काही लोक मी पाणी किती पितो ते मोजतात, पण जे मोजतात त्यांना पाणी पाजल्या शिवाय सोडणार नाही, असे इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते म्हसावद येथील प्रचारसभेत बोलत होते.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपाच्या प्रचाराचा शुभांरभ आज मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. म्हसावद येथे झालेल्या जाहीर सभेत व्यासपिठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, जि.प.अध्यक्षा ना.प्रयागताई कोळी, आमदार स्मिता वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार गुरुमुख जगवानी, डॉ.बी.एस.पाटील, पी.सी.पाटील, डॉ. अस्मिता पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, माजी सभापती लिलाबाई सोनवणे, प्रभाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सुरूवातील प्रास्तविक केले. ते म्हणाले निवडणुकीच्या काळामध्ये यांनी आमना सामना करायचा, आणि निवडणुकीच्या काळात यांच्यासाठी वेळप्रसंगी कार्यकर्ते यांनी बुथवर उमेदवार निवडणुन यावा यासाठी प्रयत्न करायचा आणि एका रात्रीत सेटलमेंट करायचं, हा धंदा जिल्ह्यातील नागरीक ओळखून आहे. या जिल्ह्यात काँग्रेसचे भाई जगताप आले व मेलेल्या काँग्रेसला फुंकर घालून उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही उमेदवार निवडून आणला नाही.