मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर प्रवास बंद

0

मुंबई| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसर्‍यांना हेलिकॉप्टर प्रवासातून बचावले. त्यामुळे आता राज्य शासनाने वारंवार घडणार्‍या या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत जोवर या अपघाताची संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही, तसेच हेलिकॉप्टर प्रवासाच्या सुरक्षिततेसंबंधी सविस्तर नियमावली तयार होत नाही, तोवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या हेलिकॉप्टरच्या प्रवासावर तात्पूरती मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. फोटो

हेलिकॉप्टरचा प्रवास ठरतोय धोकादायक
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस उस्मानाबाद येथे हेलिकॉप्टरच्या अपघातातून बचावले होते. त्याची चौकशी पूर्ण होत नाही तोच अलिबाग येथे आ. जयंत पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून ते जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ केले. तेव्हा हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागणार तोच उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले.

मुख्यमंत्री फडणवीस दुसर्‍यांदा खासगी हेलिकॉप्टरच्या अपघातातून बचावल्यानंतर मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीने मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होणार्‍या प्रवासाला तात्पूरती स्थगिती दिली आहे. सरकारने घेतलेल्या या नव्या धोरणामुळे यापुढे मुख्यमंत्री फडणवीस लांब पल्ल्याच्या प्रवासाकरता सरकारी विमानाचा वापर करतील, तसेच ज्या भागात विमान उतरवण्याची सुविधा नसेल, तिथे वाहनानेच प्रवास करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: devendra fadnavis not going to travel with helicopter now