धनाजी नाना विद्यालयात शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थ्याचे उत्स्फूर्त स्वागत

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथून जवळ असलेल्या व परिसरातील शिक्षण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात शाळेच्या पहील्याच दिवशी दि 15 रोजी विद्यार्थ्यांचे शाळे तर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले, यानंतर शाळे पर्यंत त्यांची सवाद्य मिरवणूक काढून त्यांना वर्गा पर्यंत नेण्यात आले, प्रार्थना झाल्या नंतर वर्ग सुरू झाले पहिल्याच दिवशी येथे विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय होती तर शाळे तर्फे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप देखील करण्यात आली, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते

टीप – कृपया फोटो वापरणे