सोमवार पासून सक्रीय होतील असा व्यक्त केला विश्वास
मुंबई :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आज के.ई.एम. रूग्णालयात जावुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ साहेब सोमवारपासून आपल्यात पुन्हा सक्रीय होतील असा विश्वास मुंडे यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.
भुजबळ यांना काल शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजुर केल्यानंतर मुंडे यांनी आज रुग्णालयात जावुन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत आ.अमरसिंह पंडीत, आ.जयवंत जाधव व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आपण डॉक्टरांशी डीस्चार्ज संबंधी चर्चा केली. ते आणखी दोन दिवस रूग्णालयातच राहणार असून, सोमवारपासून पुन्हा आपल्यात सक्रीय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करतानाच न्याय देवतेने न्याय दिल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.