धनंजय मुंडे यांची खड्यांसोबत सेल्फी !

0

मुंबई-राज्य सरकार राज्य खड्डे मुक्त झाले असल्याचा दावा करीत आहे. मात्र परिस्थिती वेगळी असून राज्य अजूनही खड्डे मुक्त झालेला नाही. हे दाखवून देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रस्त्यासोबत सेल्फी घेतला. खड्ड्यासोबत काढलेला फोटो मुंडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्यांसोबत मुंडे यांनी सेल्फी काढला. आता गिनीज बुक हे विश्व रेकॉर्ड होईल असा टोमणा मुंडे यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. गेल्या 4 वर्षांत सरकारने रस्ते बांधणीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत, मात्र प्रत्यक्षात हे पैसे कोणाच्या खिशात गेले असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील खड्ड्यासोबत सेल्फी काढला होता.