धरणगाव बाजार समितीच्या कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणणार !

ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात विकासकामांचे नियोजन : शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य - लताताई पाटील

। धरणगाव । प्रतिनिधी । येथील कृउबासत शेतकरी हिताच्या दृष्टीने विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. निकळ पाहून विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटच्या कामात सुसुत्रता आणि पारदर्शकता आणण्याचे युध्द पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मार्केटचा प्रत्येक शेतकरी आणि व्यापार्‍याला अभिमान वाटेल असं काम करण्या बाबत ना.पाटील यांचे आदेश असून त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यासाठी सर्व संचालक, सचिव आणि कर्मचारी परिश्रम घेत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती लताबाई गजानन पाटील आणि उपसभापती संजय पाटील यांनी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन पाटील, सचिव नवनाथ तायडे उपस्थित होते.

धरणगाव येथील रेल्वेचा उड्डाण पुल ते बाजार समिती पर्यत्नच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्ताचा कायापालट करण्यासाठी ना.गुलाबराव पाटील यांनी लाखोंचा निधी मंजूर करून कामाचे आदेश दिले आहेत. मात्र, पावसाळ्यामुळे डांबराचे काम बंद आहे. परिणामी शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी या रस्त्यावर त्वरीत मुरूम टाकण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिल्यावरून हे काम युध्द पातळीवर पुर्ण करण्यात आल्याचे सभापती लताताई पाटील यांनी सांगितले. या कामाची पहाणी आमचे नेते गजानन पाटील, संचालक ईश्वर पाटील, जिजाबराव पाटील व सचिव नवनाथ तायडे यांनी केल्याचे लताताई सोनवणे यांनी सांगितले. कासोदा उप बाजार समितीच्या आवारात सुध्दा लवकरच विकास कामे सुरू होणार असून गजानन पाटील, संचालक प्रेमराज पाटील, किरण पाटील, जिजाबराव पाटील, ईश्वर पाटील व सचिव नवनाथ तायडे यांनी पहाणी करून संबंधितांना निर्देश दिले आहेत.

*शुध्द पाणी मिळणार!*

बाजार समितीच्या धरणगाव, एरंडोल, कासोदा येथील आवारात शेतकर्‍यांना शुध्द आणि थंड पाणी मिळावे यासाठी मशिन बसविण्याच्या कामाचे आदेश देण्यात आले असून लवकरच हे काम पुर्ण होणार आहे. एका तासात हे मशिन 200 लिटर शुध्द आणि थंड पाणी उपलब्ध करून देईल. धरणगाव आणि कासोदा येथे बाजार समिती स्वखर्चातून हे मशिन बसविणार असून एरंडोल येथील उप आवारात मार्केटचे व्यापारी गटातील संचालक संजय काबरे हे स्वखर्चातून मशिन बसवून देत असल्याची माहिती सभापती लताताई गजानन पाटील यांनी दिली. ना.गुलाबराव पाटील यांचा विश्‍वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.