धरणगाव, प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्ता आघाडीची धरणगाव तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष कमलेश तिवारी यांनी जाहीर केली. तालुकाध्यक्षपदी मधुकर महाजन यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र अंकुश पाटील, भगतसिंह लोटू पाटील, अरुण नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या तालुका पदाधिकाऱ्यांमध्ये चिटणीसपदी सदाशिव पाटील, दिंगबर चौधरी, युवराज पाटील, सरचिटणीसपदी सखाराम पाटील, प्रकाश ठाकुर यांची तर सदस्य म्हणून आबाजी सोनवणे, दिलीप पाटील, रमेश पाटील, भाऊसाहेब बाविस्कर, सुधाकर भोळे यांची निवड करण्यात आली आहे.
ना.गिरीषभाऊ महाजन,यांच्या आदेशावरुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी तयार करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन आहे.