पुणे | धुळ्यात राहणाऱ्या राहुल पाटील (३५, सिंदखेडा) आणि रीना गिरीगोसावी (२५, रा. धुळे) या प्रेमीयुगलाने आळंदी परिसरात इंद्रायणी नदीच्याकाठी आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या चार दिवसांपासून राहुल व रीना दोघेही घरातून बेपत्ता होते. इंद्रायणी नदीच्याकाठी त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली आढळून आली. मृत रीना हिचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही काळापासून तिचे राहुलशी प्रेमसंबंध होते. आत्महत्येपूर्वी रीनाने आपल्या घरच्यांना फोन केला होता. त्यावेळी आपण आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले होते, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.