धुळ्यात जुगार अड्यावर आमदार अनिल गोटे यांची धाड

0
धुळे :- पांझरा नदी किनारी असलेल्या गणपती मंदिराच्या मागील बाजूस सुरू असलेला जुगाराचा अड्डा आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उध्वस्त केला.
शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याची ओरड कायम होत असते. त्या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई देखील होत असते. तरी देखील सट्टा, जुगार सुरू असल्याचे समोर आले आहे. आमदार अनिल गोटे यांनी मागील ३ ते ४ महिन्यांपुर्वी श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर कारवाई करत जुगाराचा अड्डा उध्वस्त केला होता. तशाच प्रकारची कारवाई पुन्हा आमदारांनी केली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आमदारांनी अचानक गणपती मंदिरामागील बाजूस धाड टाकली. तेथे सुरु असलेला जुगाराचा अड्डा उध्वस्त केला. घटनास्थळी पोलीस दाखल असून कारवाई सुरू आहे.