धुळे पावरी वाडा लालगोटा करांचा खड्डेमय रस्त्यातून यातनामय प्रवास

♦️ सात वर्षापासून रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - नागरीकांचा चढतोय पारा?♦️

मुक्ताईनगर । प्रतिनिधी

चिचखेडा खु ॥ ते पावरी वाडा धुळे गावापर्यंतचा रस्ता सात वर्षापासुन अत्यंत खड्डेमय झाला असून या रस्त्याने मार्गक्रमण करतांना धुळे ते पावरी वाडा वासीयांना यातनामय त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांचा पारा कमालीचा वाढत आहे. यामुळे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश खंडागळे यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा – काकोडा येथूनच जवळ असलेल्या चिचखेडा खु ॥ गावापासून अवघ्या काही अंतरावर पावरी वाडा धुळे ते लालगोटा या छोट्याशा गावामध्ये मोजक्याच आदिवासी नागरीकांची वसाहत असुन या वाड्यातील नागरीकांना दैनंदिन कामकाजासाठी चिचखेड्याच्या मुख्य रस्त्यावर येवून वढोदा किंवा कुऱ्हा – काकोडा येथे बाजारपेठ व रुग्णालय व शाळा गाठावी लागते. मात्र, या धुळे ते पावरी वाड्यातील नागरीकांना आदिवासी भागातील नागरीकांप्रमाणे खड्डेमय रस्त्यावरून यातनामय प्रवास करावा लागत आहे .

 

सात वर्षांपूर्वी पावरी वाडा ते धुळे रस्त्याचे काम मंजूर झालेले काम संबंधित ठेकेदाराने सुरु केले . मात्र, रस्त्यावर डांबरीकरण केल्यानंतर त्यावर सिल कोट न करता निधीअभावी काम अर्धवट सोडून दिल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे . परिणामी पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था झाली.

 

यामुळे या मार्गावरून चिचखेडा खु ।। येथील मुख्य मार्गावर येण्यासाठी

मार्गक्रमण करणाऱ्या वाहन धारकाना अतोनात यातनामय त्रास सहन करावा लागत असल्याने पावरी वाडा, धुळे आदी गावातील नागरीकांची अवस्था अत्यंत दुर्गम अशा आदिवासी भागातील नागरीकां प्रमाणे झाली असून संताप व्यक्त केला जात आहे. पावरीवाडा गावातील नागरीकांना दैनंदिन कामकाज अथवा रात्री अपरात्री रुग्णालयासाठी वढोदा किंवा कुऱ्हा – काकोडा गाठावे लागते. मात्र, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने त्यांना यातनामय त्रास सहन करावा लागत असूनही खासदार व दोन्ही लोक प्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे .

 

*♦️युवक काँग्रेसचा पुढाकार*♦️

पावरी वाडा ते चिचखेडा मार्गापर्यंत यातनामय प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या या समस्येकडे आतापर्यंत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर याची युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश खंडागळे यांनी सार्वजनिक विभागाकडे पावरी वाडा गावातील व्यथा निवेदनाद्वारे मांडून हा रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे . अन्यथा ग्रामस्थांसह तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे .

 

मात्र या रस्त्याने लालगोटा धुळे पावरी वाडा या गावातील नागरीक कुऱ्हा किंवा वढोदा येथे रुग्णालयात बाजारपेठ किंवा शाळेत विध्यार्थी ये जा करतात मात्र या रस्त्याने वाहनाने तर सोडाच पाई चालनेपण कठीण झाले आहे अनेक वेळा लोकप्रतिनिधी येतात मात्र आदिवासींची मते घेण्यासाठी मात्र त्यांच्या अडीअडचणी पाहत नाही अनेक वेळा सांगूनही कोणी लक्ष्य का देत नाही असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे .

 

सदर रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे यासाठी युवक काँगेस चे तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांनी सार्वजनीक बांधकाम विभागास निवेदन दिले आले

 

◆प्रथम तालुक्याचे भाग्य पण पदरी निराश्या◆

 

प्रथम तालुक्याला एक खासदार तर दोन आमदार लाभल्याने या मतदार संघात नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या मात्र दोन्ही आमदार एकमेकांचे राजकीय उणेंदुने काढत असल्याने विकास कामे होत नसल्याने नागरिकांच्या पदरी निराश्या दिसत आहे