धुळे : : ३५ गावातील अडीच हजार शेतकऱ्यांचे बाराशे हेक्टरवर नुकसान

धुळे प्रतिनिधी ।

जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी पावसासह गारपट्टीचा कहर सुरूच आहे. अवगघ्या तीन दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे ३५ गावांतील सुमारे २४८६ शेतकऱ्यांच्या १२८२ हेक्टर वरील पिकांना त्याचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. सर्वाधिक नुकसान हे धुळे तालुक्यात झाले असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात कहरच केला आहे. टप्प्याटप्प्याने पडलेल्या या पावसामुळे हजारो हेक्टरचं नुकसान धुळे जिल्ह्यात झालं आहे. तर

दुसरीकडे तीन दिवसात झालेल्या पावसामुळे सुमारे १२८२ पिकांना मोठा फटका बसला आहे.

काही भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी असून त्याची मदत मिळत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा धुळे जिल्ह्याला २७ ते २९ एप्रिल दरम्यान पावसाने झोपून काढले आहे. यात सर्वाधिक नुकसान हे धुळे तालुक्यात झाले असून यात वीस गावातील ८३९ शेतकऱ्यांच्या ४९२ हेक्टर वरील कांदा ज्वारी बाजरी टरबूज लिंबू पपई आदी पिकांचं मोठं नुकसान झाला आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यातील नऊ गावातील १९०० शेतकऱ्यांचे ४९५ हेक्टर वरील कांद्याचे नुकसान झाले आहे. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आला आहे.