चोपड्यामध्ये डायलिसिस सुविधा; चोपडा रोटरी व हरताळकर हॉस्पिटल चा पुढाकार

चोपडा (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ चोपडा व हरताळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने चोपडा रोटरी डायलिसिस सेंटर हरताळकर हॉस्पिटल येथे हे केंद्र सुरू केले जाणार असून गुरुवार, 29 जून संध्या 5 वाजेला आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर याचे लोकार्पण होईल.

चोपडा तालुक्यात व परिसरातील रूग्णांसाठी शहरामध्ये डायलेसिस यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रूग्णांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये जावे लागते. यात रूग्णाला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसतो. त्यासाठी चोपडामध्ये ही सुविधा असावी अशी मागणी होती.

त्यामुळे आता चोपडा शहरात रूग्णांसाठी डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे. डायलिसिस सेंटर सुरु करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या कळून विशेष सहकार्य मिळालेले असून रोटरी डायलिसिस सेंटर च्या माध्यमातून अल्प दरात हि सुविधा रुग्णांना दिलीजाणार आहे.