मन की बात कार्यक्रमाचे लोणारी कार्यालयात डिजिटल प्रसारण-
नगरसेविका अनिता सपकाळे आणि सतिष सपकाळे यांचा उपक्रम !
भुसावळ l भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या बहुचर्चित कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी अकरा वाजता प्रसारित होणार आहे. भुसावळ मतदार संघाचे आमदार श्री. संजय सावकारे व सौ. रजनी सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेविका अनिता सतिष सपकाळे आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्यातर्फे लोणारी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे सार्वजनिकरित्या 24 बाय 16 च्या मोठ्या डिजिटल स्क्रीनवर प्रसारीत करण्यात येणार आहे.
100 व्या भागानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मन की बातच्या 100 व्या भागानिमित्त शहरातील नागरीकांच्या सुदृढ आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर रविवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान लोणारी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
परिसरातील नागरिकांनी मन की बात कार्यक्रमात सहभागी व्हावे व मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भाजप नगरसेविका अनिता सतिष सपकाळे आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांनी केले आहे.