दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती खालावली

0

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची प्रकृती उपोषणादरम्यान खालावली असून तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आयएएस अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात मुख्यमंत्री केजरीवाल आणि सहकारी मंत्र्यांनी उपोषण सुरू केले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून नायब राज्यपालांच्या निवासस्थानी उपोषण सुरू असून अद्यापपर्यंत त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याच्या आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या सहकारी मंत्र्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री गोपाल राय व सत्येंद्र जैन हे आंदोलनात सहभागी आहेत. चार महिन्यांपासून कामे अडवून ठेवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांना संप मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.