जेएनयू प्रकरण: दीपिकाच्या जाहिरातींवर दोन आठवड्यासाठी बंदी !

0

नवी दिल्ली: अभिनेत्री दीपिका पदुकोनने दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावरून तिच्यावर टीका होत आहे. तिचा छपाक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. दरम्यान आता त्याच्या जाहिरातींवर काही काळ बंदी घालण्याचा निर्णय जाहिरात कंपनींनी घेतला आहे. दीपिका पदुकोन यांच्याविषयी निर्माण झालेला वाद निवळत नाही तो पर्यंत दोन आठवड्यासाठी दीपिका पदुकोनच्या सर्व जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय जाहिरात कंपनींनी घेतला आहे.

जेएनयूच्या विद्यार्थ्यासोबत दीपिका पदुकोनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभरात टीका होत आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच आता त्यांच्या जाहिरातीवर जाहीर कंपनी दोन आठवडे बंदी घालणार आहे.