मुंबई: अॅसिड हल्ल्याच्या सत्य घटनेवर आधारित दीपिका पादुकोणचा बहुचर्चित चित्रपट ‘छपाक’चा ट्रेलर आज मंगळवारी रिलीज झाला आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण अॅसिड हल्ल्यात पीडित लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाने साकारलेल्या पात्राचे नाव मालती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. राझीनंतर गुलजार यांचे हे चित्रपट आले आहे. या चित्रपटातील दीपकाचे ‘उन्होंने मेरी सूरत बदली, मेरा मन नहीं’ हा डायलॉग अक्षरश अंगावर शहारे आणणारे आहे. यातून दीपिकाच्या दमदार अभियानाचे प्रत्यय येते.
‘छपाक’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता आहे. आजच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर खूप चांगला असून दीपिकाने दमदार अभिनय केला आहे.
अॅसिड अटॅकनंतर ती स्वतःच्या चेहऱ्याचा तिरस्कार करू लागते आणि नंतर स्वतःवर प्रेमही करू लागते. त्यानंतर मालती देशातील अॅसिड अटॅक झालेल्या मुलींसाठी काम करू लागते. तिच्या या प्रवासात तिला विक्रांत मेस्सी (चित्रपटातील नाव अमोल) मदत करतो. ट्रेलरमध्ये अमोल व मालती यांच्यामध्ये प्रेमाची भावना देखील पहायला मिळते. ट्रेलरच्या अखेरीस मालतीच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य त्यांनी माझा चेहरा बदललाय माझं मन नाही हे मनाचा ठाव घेतो.