मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोन लग्न कार्यातून आता मोकळी झाली आहे. दीपिका पादुकोण आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. दीपिका लग्नानंतरचा पहिला चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या आयुष्यावर करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्याचा शोध सुरु होता. या भूमिकेसाठी राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा यांच्यात स्पर्धा सुरु होती.
अखेर राजकुमार राव यांचे नाव मुख्य अभिनयासाठी फायनल झाले आहे.
मेघना गुलजारने आपल्या या आगामी चित्रपटासाठी राजकुमारला फिक्स केले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. राजकुमारने या वर्षात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. श्रद्धा कपूरसोबतचा त्याचा ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट तर यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.