भारतीय तटरक्षक दलाच्या प्रमुखपदी के.नटराजन !

0

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दलाच्या प्रमुखपदी के.नटराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज ३० जून रोजी निवृत्त होणाऱ्या राजेंद्र सिंह यांची जागा ते घेणार आहे. १८ जानेवारी १९८४ मध्ये तटरक्षक दलात सहभागी झालेले के.नटराजन यांच्याकडे मद्रास विश्वविद्यालयाची पदवी आहे. आजपर्यंत विविध महत्वपूर्ण पदाची त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे.