मुंबई :सलमान खानने आपला मित्र अनिल कपूरची मुलगी सोनम आणि शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीसोबत चित्रपटांमध्ये रोमान्स केला आहे. त्याने २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. आता ८ वर्षांनंतर सलमान या चित्रपटाच्या तिस-या भागात अजून एका न्यू कमरला ब्रेक देणार आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार ‘दबंग-3’ मधून सलमान खान महेश मांजरेकांची मुलगी अश्वामी मांजरेकरला लॉन्च करणार आहे.
मेकर्सला सोनाक्षीसोबत अजून एक अभिनेत्री हवी आहे. मौनी रॉय चित्रपटात असणार आहे. पण तिने एका मुलाखतीत स्पष्ट सांगितले की, ती ‘दबंग-3’ चा भाग असणार नाही. लेटेस्ट अपडेटनुसार अश्वामी या चित्रपटाचा भाग बनणार नाही.