मुंबई – धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे बॅनर्स/पोस्टर्सवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने पक्षाचे कोणतेही पद नसतांना निवडणूक लढविली सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस – संजय पवार गटाचा उल्लेख करून पक्षाच्या नेत्यांचे नाव, चिन्ह, फोटो लावून पदाधिकारी/कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी दुफळी नाही. ती तुम्ही निर्माण केली शिवाय हे बॅनर/पोस्टर ताबडतोब काढून टाकावेत, असे पत्र देवूनही आपण वरील सूचनांनुसार कोणतीही कार्यवाही केली नाही आणि कार्यालयाला लेखी खुलासा पाठवण्याची तसदीही घेतली नाही. तसेच भाजपाचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही पूर्वपरवानगी न घेता पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरून शुभेच्छा दिल्यात हा पक्ष शिस्तभंग आहे म्हणून आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षविरोधी कारवाया, वारंवार सूचना देऊनही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात कारवाया केल्या असून, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आपण गैरसमज पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे, म्हणून आज १६ मे पासून आपणास पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे.
यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे नाव, चिन्ह, छायाचित्रे वापरू नयेत. तसे केल्यास तुमच्यावर पुढील योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पत्र देत संजय पवार यांची राँ.काँ.मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.