भुसावळ प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे सावदा विभागात यंत्रचालक पदावर कार्यरत असलेले संदीप शालिग्राम चौधरी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे औचित्य साधून येथील मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता कैलास हमणे यांच्या हस्ते तसेच अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के याच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आला. यावेळी उप. मुख्य औद्योगिक समंध अधिकारी शेलकर तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी खेडकर, आहारतज्ज्ञ डॉ. निशा पाटील, वक्ते राकिब अहेमद उपस्थित होते. हा पुरस्कार धुळे, नंदुरबार, जळगाव सर्कलमधील एकूण ६२ कामगारांना देण्यात आला.