राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडकोरबाई शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

 शहादा :- 
येथील लाडकोरबाई शाळेत  राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या प्रवेशोत्स्वाच्या दिवशी श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शहाद्याचे गटशिक्षणाधिकारी योगेश साळवे, मनसे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे,  शालेय शिक्षण समितीचे   ऍड. राजेशजी कुलकर्णी, मनसे नंदुरबार जिल्हा सचिव योगेश सोनार, तालुका सचिव अमेय राजहंस, शहादा शहर अध्यक्ष सुहास (दादू) पाटील, शहर सचिव रविकांत संजराय, भावेश सोनावणे मुख्याध्यपिका श्रीमती मायबाई जोहरी, आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षिका व पालकवर्ग उपस्थित होते. कार्याकार्माच्या यशस्वीतेसाठी मनसेच्या शहादा शहराच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी परिश्रम घेतले.