नंदुरबार येथील एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेतर्फे तळोदा तालुक्यातील दसवड जिल्हा परिषद शाळेतील ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी तळोदा :–

नंदुरबार येथील एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेतर्फे तळोदा तालुक्यातील दसवड जिल्हा परिषद शाळेतील ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसून आला.

नंदुरबार येथील एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना ही अनेक वर्षांपासून गरीब व दुबळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत असते. तसेच आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात देखील वेळोवेळी आवाज उठविण्याचे काम करत असते. तळोदा तालुक्यातील दसवड येथील जिल्हा परिषद शाळेचे

मुख्याध्यापक उमेश पाडवी यांनी आदिवासी क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विरेंद्र अहिरे यांची भेट घेतली व आमच्या शाळेतील गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी शैक्षणिक साहित्य मिळावे अशी अपेक्षा त्यांच्याजवळ व्यक्त केली. यांनतर विरेंद्र अहिरे यांनी तत्काळ आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व शाळेच्या ७० विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या दर्जाचे दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेना, पेन्सिल, रब्बर यांसह शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य आणून दिले. व यापुढे देखील शाळेसाठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आवर्जून सांगा असे त्यांनी यावेळी सांगितले. एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना ही नेहमी गरीब, दीन दुबळ्या लोकांच्या हितासाठी काम करत असते. आमची संघटना ही फक्त नंदुरबार जिल्ह्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत असते. असे ते यावेळी म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गावित, कार्याध्यक्ष लखन गावित, नंदुरबार तालुका अध्यक्ष भरत साबळे, उपाध्यक्ष मनोहर कडवे, तालुका कार्याध्यक्ष विजू पाडवी, निलेश अहिरे, महेंद्र राजपूत, भुऱ्या पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष अरविंद पाडवी,

दसवड गावाचे उपसरपंच दीपक वसावे, नंदकिशोर ठाकरे, सौरभ ठाकरे, कांतीलाल वळवी,आदी यावेळी उपस्थित होते.

*प्रतिक्रिया*

ग्रामीण भागामधील अत्यंत गरीब मुल व मुली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात.मुलांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असते.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे दप्तर, वही, पेन नसतात हे मी अनुभवलं यामुळे मनात विचार केला की एखाद्या मदत करणाऱ्या संघटनेला सांगावं व विद्यार्थ्यांसाठी मदत मागावी म्हणून मी नंदुरबार येथील एकलव्य आदिवासी क्रांती दल च्या पदाधिकारी यांना भेटलो व त्यांना सांगितलं त्यांनी लगेचच माझ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणून दिले. त्या बद्दल त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो.

उमेश पाडवी

मुख्याध्यापक दसवड ता.तळोदा

 

 

*चौकट*

ग्रामस्थ व संघटनेच्या पदाधिाऱ्यांनी केले वृक्षारोपण

 

जिल्हा परिषद दसवड शाळेमधील शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपल्यानंतर गावातील ग्रामस्थ व एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शाळेच्या परिसरामध्ये विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले.व या लावलेल्या झाडांची व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी शिक्षकांनी व विद्यार्थिनींनी घेतली. शाळेचे मुख्याध्यापक उमेश पाडवी यांनी झाडांचे महत्व विशद केले. व आगामी काळात देखील संपूर्ण गावामध्ये देखील विविध प्रकारचे झाड लावान्यात येणार असल्याचे सांगितले.