चोपडा प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ चोपडा व साई फार्मा चोपडा तर्फे प्रार्थमिक आरोग्य केंद्र लासूर येथे गर्भवती मातांसाठी मोफत 100 आर्यन सुक्रोज औषदांचे वाटप करण्यात आले.
गरोदर असताना शरीरात लोह असणं फार गरजेचं असतं. कारण त्याची कमतरता असल्यास याचे परिणाम गर्भवती महिलेसोबतच तिच्या गर्भातील बाळालाही भोगावे लागू शकतात. गरोदर असताना लोहाची कमतरता असेल तर वेळेआधी डिलिव्हरी होऊ शकते किंवा बाळाचे वजन कमी होण्याचा धोका अधिक वाढू शकतो. गर्भवती स्त्रियांना लोहाची आवश्यकता अधिक असते कारण यामुळे शरीरातील रक्त वाढते आणि प्रसूतीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब चोपडा व साई फार्मा चोपडा तर्फे गरीब व गरजू गर्भवती मातांना मोफत आयरन सुक्रोज औषधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील प्रकल्प प्रमुख डॉ नीता जैस्वाल डॉ प्रतिभा पाटील साई फार्माचे संचालक प्रवीण मिस्त्री चेतन टाटिया अरुण सपकाळे चंद्रशेखर साखरे अर्पित अग्रवाल लासूर प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे डॉ नितीन अहिरे डॉ प्रशांत पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते