पाचोरा ( प्रतिनिधी )कुरंगी ता पाचोरा येथे पाचोरा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर कृषी प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत व कुरंगी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील शेतकऱ्यांना खरीप लागवडीसाठी मका बियाण्याचे किट संपूर्ण मोफत वाटप करण्यात आले आहे.
कुरंगी तालुका पाचोरा येथे दिनांक १९ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील ३० शेतकऱ्यांना खरीप मका लागवड करण्यासाठी पाचोरा कृषी विभागातील तंत्र विज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव पर्यवेक्षक यु .आर .पाटील कृषी सहाय्यक एस. पी .धनराळे यांच्यासह सरपंच सीमा पाटील आत्मनिर्भर कृषी कंपनीचे संचालक विशाल नेवे .गौरव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना मका बियाणे किट मोफत देण्यात आले. यावेळी कुरंगी ग्रामपंचायत उपसरपंच शालीग्राम पाटील सदस्य योगेश ठाकरे गणेश पाटील दिनकर सोनवणे पंढरीनाथ पाटील अविनाश कोळी यांच्यासह गावातील महिला युवा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.