धरणगाव परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय बुटांचे वाटप
शिवसेनेचे नेते पप्पू भावे यांच्याकडून अनोखी भेट : देवगिरी कल्याण आश्रमाचा उपक्रम
। धरणगाव । प्रतिनिधी ।
शिक्षणाची कास धरत अनवाणी शोळेत जाणार्या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना शिवसेना नेते पप्पू भावे यांच्याकडून बुटांचे वाटप करण्यात आले. पप्पू भावे यांनी दाखविलेल्या सहह्दयतेमुळे या बालकांच्या शिक्षणाची वाट सुकर झाली आहे. समाजातील नागरिकांनी पप्पू भावे यांचा आदर्श घेूवन मदतीचा खारीचा वाटा उचलला तरी उपेक्षीतांना लढण्याचे बळ मिळेल अशी भावना याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली.
धरणगाव परिसरातील पिंपळे आणि चोपडा रस्त्यावर आदिवासी पावरा समाजातील विस्तापीत कुटूंब राहतात. शेतात आणि जिनिंगमध्ये काम करून या कुटूंबांचा उरनिवार्ह चालतो. मात्र, अशाही परिस्थितीत आपल्या मुलांनी शिक्षण घेवून मोठं व्हाव असे वाटत असल्याने आदीवासी बांधवांनी मुलांना शाळेत दाखल केले आहे. पुस्तक, वहीए गणवेश शोळेतून मिळत असला तरी बुट मिळत नसल्याने या बालकांची अनवाणीच शिक्षण यात्रा सुरू होती. दरम्यान, आदिवासी तांडा, पाड्यावर राहणार्या या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बालसंस्कार केंद्र चालकांनी याबाबत पप्पू भावे यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी पप्पू भावे यांनी तात्काळ बुट उपलब्ध करून दिली. कैलास माळीसर यांच्या उपस्थितीत पप्पू भावे यांच्या हस्ते बुटांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे कैलास माळीसर, शिवसेनेचे शहरप्रमुख विलास महाजन, उद्योपती वाल्मिक पाटील, प्रशांत देशमुख, चेतन पाटील, महेश क्षत्रिय यांची उपस्थिती होती. उद्योगपती जिवनआप्पा बयस यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यत आले होते.आदिवासी वस्तीतील पालकांनी पप्पू भावे आणि जीवन आप्पा बयस यांचे आभार मानले. समाजातील वंचित घटकाच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी पप्पू भावे यांनी दिले. देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने या भावे, बयस यांचे आभार व्यक्त करण्यात आले.