भुसावळ प्रतिनिधी दि 21
भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, गणवेश, वह्या वाटप करण्यात आल्या . प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ललित कुमार फिरके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व सर्व विद्यार्थ्यांनी गणवेशात येण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाने मुलांच्या पाठीवरती ओझे कमी केलेले आहे. त्यासाठी पुस्तकांची निर्मिती चार भागात करण्यात आलेली असून त्यात सर्व विषय दिलेले आहेत. पहिल्या चाचणीसाठी एक भाग, पहिली चाचणी ते सहामाही परीक्षा, दुसरा भाग, सहामाही परीक्षा ते द्वितीय घटक चाचणी साठी तिसरा भाग, द्वितीय घटक चाचणी ते वार्षिक परीक्षेसाठी चौथा भाग असा अभ्यासक्रम असेल.त्यासाठी मुलांनी चाचणी पर्यंत प्रथम भागच शाळेत आणावा, पुस्तकामध्ये नोटस साठी ची पेज दिलेली आहे त्याचा उपयोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर नियमित यावे. अशा विविध सूचना दिल्या.कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ शिक्षिका मालती भिरुड, सरला सावकारे, संध्या धांडे, के.पी. बेंडाळे, डॉ. प्रदीप साखरे, नाना पाटील, एन. एच. राठोड, एम. एच. किरंगे, ग्रंथपाल अरुण नेटके, मनोज चौधरी, यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती . ग्रंथपाल अरुण नेटके यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना पाटील यांनी तर आभार के. पी. बेंडाळे यांनी मानले.