जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधीकरणाचे कार्यालय फोडले

0

कॅश हाती न लागल्याने बेसींगची तोडफोड, दोन नळे काढून नेली ; पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी दिली भेट

जळगाव- शहरासह जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरुच आहे. एकही दिवस चोरीविना जात नसल्याने चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याच्या चोरी केल्यानंतर हिंमत वाढलेल्या चोरट्यांनी जिल्हा न्यालयातील जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे कार्यालय फोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. यात चोरट्यांनी विधीसेवा प्राधीकरणाचे सचिवांसह त्यांच्या शेजारचे अधीक्षकांचेही कार्यालय फोडले. मात्र कुठलीही रक्कम हाती न लागल्याने चोरट्यांनी संगणकासह कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली, बाथरुममधील बेसिंग फोडून तेथील दोन नळे चोरुन नेले आहे.

जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयात ठोंबरे यांच्या शेजारीच अधीक्षक पी.जी.नगरकर यांचेही कॅबीन आहे. या कार्यालयातील शिपाई एस.टी.पाटील हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी 10.15 वाजेचे सुमारास कार्यालयात आले. त्यांना कार्यालयाचे दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये प्रवेश केला असता, सचिव के.एच. ठोंबरे यांचे कॅबीनमधील कपाट उघउडले, कॉम्प्युटर टेबलावर उलटा तर ठोंबरे यांचा कोट टेबलावर पडलेला होता. तसेच ड्राववरमधील सर्व कागदपत्रे टेबलावर पडलेले दिसले. बाथरुम उघडून पाहिले असता, तेथील बेसींन तोडलेले व तेथील नळ काढून नेल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे अधीक्षक नगरकर यांचेही कॅबीनमध्ये कपाटातील कॅश बॉक्स हा टेबलावर काढून ठेवलेला होता.

पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी
शिपाई पाटील यांनी सचिव ठोंबरे यांना माहिती दिली. ठोंबरे यांनी कार्यालय गाठले पाहणी करुन प्रकार जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांना प्रकार कळविला. न्या. सानप यांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह कर्मचार्‍यांनीही यावेळी पाहणी केली. याप्रकरणी अधीक्षक नगरकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.