मध्यस्थी प्रकियेमुळे पक्षकारांना वेळच्या वेळी न्याय मिळेल

0

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांचे प्रतिपादन ; जिल्हा न्यायालयात जनजागृती शिबिर

जळगाव – मध्यस्थी प्रक्रियेव्दारे प्रकरणे जास्तीत जास्त निकाली निकाल्यास न्यायालयीन खटल्यांचा बोझा कमी होण्यास मदत होवून पक्षकारांना वेळीच न्याय मिळेल, त्यामुळे मध्यस्थी प्रकियेव्दारे खटले निकाली ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश गोविंद सानप यांनी केले. जिल्हा न्यायालयात आवारात शनिवारी आयोजित मध्यस्थी प्रक्रिया जनजागृती शिबिराप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधीकरणतर्फे मध्यस्थी प्रक्रिया शिबिर पार पडले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पी. बी.चौधरी, जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. केतन ढाके, विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे उपस्थित होते. या शिबिरात मध्यस्थी प्रकियेवर न्या. एस.एम. फड यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे मध्यस्थी प्रकियेत मध्यस्थांचा सहभाग, मध्यस्थी करीता येणारी प्रकरणे, ठेवता येणारी प्रकरणे तसेच न ठेवता येणारी प्रकरणे, मध्यस्थीचे फायदे या विषयांवर साध्या व सोप्या भाषेत न्या. फड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. केतन सोनार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायालयातील सर्व वकील बांधव, विधी सेवा प्राधीकरणचे सदस्य, तसेच बँकांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.