केसपेपरसह आहार शुल्क, ईजीसी, सीटीस्कॅनच्या दरातही वाढ
जळगाव : जिल्हा शासकीय रूग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारपासून आरोग्य सेवेचे दर वाढणार आहेत. यात आहार शुल्कासह, ईजीसी, सीटीस्कॅन व एक्सरेचाही समावेश आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्राप्त झाला असल्याची माहिती प्रभारी डॉ. किरण पाटील यांनी शुक्रवारी दिली. या दरवाढीची गरीब गरजू व्यक्तींना झळ सोसावी लागणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने सेवेत वाढीचा शासन निर्णय प्राप्त झाला आहे. यापूर्वी बाह्यविभागात केस पेपर काढण्यासाठी रूपये दहा आकारले जात होते. आता त्यात दहा रूपयांची वाढ झाली असून सोमवारपासून वीस रूपये आकारले जाणार आहेत. आहार शुल्कासाठी पूर्वी 25 रूपये आकारले जात होते.त्यात पाच रूपयांची वाढ करण्यात आली असून यापुढे तीस रूपये मोजावे लागणार आहेत. ईसीजीसाठी पूर्वी 50 रूपये दर आता 70 रूपयांवर पोहोचले आहे. सीटीस्कॅनसाठी 50 रूपयांची वाढ केल्याने यापुढे 350 रूपये आकारले जात होते.एक्सरे पूर्वी 5 0 रूपये होता. आता हा दर 70 रूपयांवर गेला आहे. सोनोग्राफीसाठी 110 रूपयांची फी आकारली जाणार आहे.