जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांचा इशारा ; पोलीस विभागाकडून यादी प्राप्त झाली असल्याची माहिती ; 15 दिवसात कारवाईबाबतच्या नोटीस
जळगाव – आरोपींना अटक व्हावी, प्रलंबित गुन्ह्यांमधील अनेक वर्षापासूनचे फरार आरोपी यांना अटक व्हावी, या उद्देशाने जिल्हा पोलीस दल व जिल्हा न्यायालयाने एकत्रितरित्या ई समन्स, ई वॉरंट अशी ऑनलाईन प्रणाली राबविण्यात येत आहे. यात वॉरंट बजावण्यामध्ये, नोटीस बजावण्यात काही पोलीस कर्मचारी हे खोटा रिपोर्ट र्देुी कामात कसूर करत असल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचार्यांना फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात येवू नये अशा नोटीस बजावण्यात येवून लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कार्यसन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात जिल्हा व प्रमुख न्यायाधीश गोविंद सानप यांनी दिला.
जिल्हा पोलीस दल, पिपल्स पिस फाऊंडेशन व त्रिमुर्ती फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यसन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन मनोगतात न्या. सानप बोलत होते. न्या. गोविंद सानप यांच्या हस्ते या सोहळ्यात पोलीस कर्मचारी अधिकारी, सरकारी वकील तसेच पैरवी, साक्षीदार यांचा गौरव करण्यात आला.
तपासातील त्रृटींबद्दलही केल्या सुचना
यावेळी कार्यक्रमात न्या. गोविंद सानप यांनी पोलीस कर्मचारी तसेच अधिकार्यांकडून गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करताना राहणार्या त्रृटीबद्दलही चर्चा केली. अनेक त्रृटी तपासात राहतात. तपासातील या त्रृटीं आमची झोप उडवित असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्वतःतील या त्रृटी कमी होण्यासाठी काही सुचनाही त्यांनी योवळी उपस्थित अधिकारी कर्मचार्यांना दिल्या. विशेष म्हणजे या त्रृटी राहू नये व दोषसिध्दी होवून शिक्षेचे प्रमाण वाढावे म्हणून एक जबाबदार अधिकार्याची नेमणूक करण्याची विनंतीच त्यांनी यावेळी अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांना केली. त्यामुळे कर्मचार्यांकडून गुन्हयाचा कशा पध्दतीने तपास होतो
काय म्हणाने मनोगतात न्या. गोविंद सानप
वॉरंट बजावण्यामध्ये, नोटीस बजावण्यामध्ये खोटा रिपोर्ट देणार्याची माझ्याकडे यादी सोपविण्यात आलेली आहे. आनंदाचा सोहळा, त्यावर विरजण घालणार नाही, कोर्टाची नोटीस न बजावणे हा फौजदारी गुन्हा आहे. तुमचे रिपोर्ट खरे की खोटे हे वाचल्यावरच कळते, कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर भूमिका घेणे महत्वाचे असते. एवढया उत्साहाने जर कोणी अधिकारी काम करीत असतील व तुम्ही त्यात खोडा घालण्याचा जर काम करत असाल , त्याचे किती गंभीर परिणाम होतात हे तुमच्या पोलीस दलाला सुध्दा कळल पाहिजे. काही दिवसांनी तुमच्यापैकी काही लोकांना आम्ही तुमच्या विरोधात फौजदारी गुन्हा का नोंदवू नये अशी नोटीस बजावली तर आश्चर्य वाटू देवू नका, असा इशारा कार्यक्रमात न्या. गोविंद सानप यांनी कर्मचार्यांना दिला.