जळगाव प्रतिनिधी ।
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे ५ ते ७ मे दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धे साठी जिल्हास्तरीय निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेतून जिल्ह्याचा संघ जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी जाहीर केला. जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा बी. यु. एन. रायसोनी विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन वरणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. आशिषकुमार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, कार्याध्यक्ष गिरीश पाटील, प्राचार्य उत्तम चिंचाळे उपस्थित होते. स्पर्धेतील अंतिम सामना इंदिराबाई ललवाणी विद्यालय (जामनेर) आणि सारजाई कुडे विद्यालय ( धरणगाव) यांच्यात झाला. त्यात इंदिराबाई ललवाणी विद्यालय विजयी तर सारजाई कुडे विद्यालय उपविजयी झाले. निवड झालेल्या खेळांडूची नावे अशी- कल्पेश समाधान गावंडे, मयूर संदीप चांडे, विनायक परमेश्वर सपकाळे, ओम प्रकाश चांदोले, विलास सोहम जाधव, तेजस नितीन राऊत, सुमित संजय चिंचोले, तन्मय गणेश पाटील (सर्व इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेर), जयेश अनिल पाटील, जयेश विश्वास पाटील, तुषान ज्ञानेश्वर पाटील, रणविरसिंग आकाश पाटील (सर्व सारजाई कुडे विद्यालय, धरणगाव) यांचा समावेश आहे.
निवड समिती सदस्य म्हणून डॉ. रणजित पाटील, योगेश सोनवणे, नितीन पाटील, राहुल साळुंके यांनी काम पाहिले. स्पर्धेत मुख्यपंच म्हणून प्रा. समीर घोडेस्वार, नितीन पाटील, गिरीश महाजन, विजय रोकडे तर गुणलेखक म्हणून सचिन महाजन, गिरीश महाजन यांनी तर प्रसन्न जाधव, धिरज पाटील यांनी रेषापंच म्हणून काम पाहिले. संघ प्रशिक्षक
म्हणून प्रा. समीर घोडेस्वार तर संघ व्यवस्थापक म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. संघाचे सराव शिबीर एकलव्य क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू सुष्मीत पाटील व साहिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. सूत्रसंचालन जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी केले..