खेळपट्टीने काय फरक पडतो , खेळ सुधारा

भारत आणि इंग्लंडमध्ये झालेली चार कसोटीतील तिसरी कसोटी चक्क दोन दिवसांतच संपली. भारताने हि कसोटी १० गडी राखून हा जिंकली. यामुळे चौथी आणि अखेरची कसोटी हि निर्णायक ठरणार आहे. मात्र अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. अशातच महान माजी महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी खेळपट्टीवरुन सुरू असलेल्या वादात उडी घेतली असून खेळपट्टीचा बचाव करत इंग्लंडच्या खेळाडूंना खडेबोल सुनावलेत. जर मला संधी मिळाली असती तर मी चौथ्या सामन्यातही तशीच खेळपट्टी बनवली असती, असं रिचर्ड्स म्हणालेत.

खेळ सुधारा :-

कसोटी लवकर संपल्यावरुन रडगाणं गात बसण्यापेक्षा इंग्लंडने परिस्थिती समजून घ्यायला हवी…खेळ सुधारायला हवी…चौथ्या सामन्यात आपल्याला आधीच्याच खेळपट्टीवर खेळावं लागेल असा विचार करुन त्यांनी तयारी करायला हवी. जर मी भारतात असतो किंवा खेळपट्टी बनवणं माझ्या हातात असतं तर चौथ्या कसोटीसाठी मी तशीच खेळपट्टी बनवली असती असं ते म्हणाले.